My Break-Up Pachinga Marathi
My Break-Up Pachinga Marathi
माझ Break-Up झालं 😭😭😭
ठाऊक आहे मला मी नसताना तू रडशील एकदा का होईना माझी आठवण काढशील ..
आज perfect ९:३० ला माझा break up झाला...आणि मला दिवाळीचा bonus मिळाला....मी तर exactly Dhvani Bhanushali सारखे बोलतोय...पण हे खरे आहे.. actually तिने call करून ५ दिवसा पूर्वीच मला सांगितले कि तिला कोणी तरी propose केले आहे.आणि तिने ते accept केले...मला तर विश्वासच बसला नाही. मला वाटले ती माझी आठवण काढत असेल म्हणून इतक्या रात्री कॉल केला असेल. पण असे काही नव्हते. तिला Break -Up करायचे होते. आणि ती असून सांगत होती. मला हि त्यावेळी काही जास्त फील झाले नाही. मी कधी तिला काही करायला अडवले नाही कधी . आज हि तिला थांबवू शकलो नाही . आणि मला हि वाटले कि मला काही फरक पडणार नाही ती माझ्या life मधून गेल्यावर...
पण झाले वेगळेच पहिले चार -पाच दिवस मला काहीच वाटले नाही . Life Normal होती . रोजचीच कामे काही वेगळे नाही. पण पाचव्या दिवशी रात्री काही तरी झाले. अचानक असे वाटले ती माझ्या डोळ्यां समोर आली.सगळे जग Slow - Motion झाले . मला फक्त ती दिसत होती माझ्या डोळ्यानं समोर.... आणि माझी नजर तिच्या नजरेला भिडली. काही क्षण सगळे शांत झाले . मी तिच्या काळ्याभोर डोळ्यांत पाहत होतो . किती वेळ झाले तरी माझी पापणी लवली नव्हती. कधी काळी तिच्या डोळ्यात पाहिलेले ते प्रेम जे माझ्यासाठी होते ते मी पाहत होतो . अचानक माझे डोळे पाणावले. काळजात एक कळ येऊन गेली . मी एक सुस्कारा सोडला. हा भास होता. मला जाणवले आता ती पुन्हा कधी माझ्या आयुष्यात परत येणार नव्हती . त्या रात्री मला झोप लागली नाही संपूर्ण रात्र मी बस तिच्या सोबत घालवलेले सुंदर क्षण आठवत होतो. तिची प्रत्येक गोष्ट माझ्या लक्ष्यात होती. पण का कोणास ठाऊक पण आमच्या पहिल्या kiss ची आठवण जास्त ठळक होती. तिच्या ओठांचा तो पहिला स्पर्श तो अप्रतिम सुगंध अजूनही माझ्या ओठांवर होता . अश्रू आता अनावर झाले होते माझ्या डोळ्यांच्या कडा आता त्यांना थांबवू शकत नव्हत्या . असे नाही कि मी आयुष्यात कधी रडलो नव्हतो ..पण आज माझे ह्रदय पण माझ्या बरोबर रडत होते . हि Feeling मी तुम्हाला कशी सांगू तेच मला कळेना. कदाचित तुमच्यातल्या ज्यांचे या आधी Break Up झाले असेल त्यांना माझी अवस्था समजले . माझे मन बोलत होते कि तिला कॉल कर " ती तुझी आहे. " तिला परत आण. पण मेंदू वेगळे म्हणत होता ती कोना दुसऱ्यासाठी आपल्याला सोडून गेली आहे. ती आता आपली राहिलेली नाही.
" रूठ के जाता तो मना लेते उसे , उसने हस्के छोडा हे ... "

Comments
Post a Comment